Site icon wartaa.in

महिलांच्या हातात स्थानिक स्वराज्य सत्तेची चावी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील – प्रदेशाध्यक्षा वैशालीताई नागवडे:

महिलांच्या हातात स्थानिक स्वराज्य सत्तेची चावी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील – प्रदेशाध्यक्षा वैशालीताई नागवडे:
Share on

वार्ताहर : अजय शहारे | गोंदिया

महिलांच्या हातात स्थानिक स्वराज्य सत्तेची चावी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील – प्रदेशाध्यक्षा वैशालीताई नागवडे*

*जिल्ह्यातील महिला नेतृत्वाला संधी देऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करू – खा. राजेंद्र जैन*

आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली, जनसंपर्क कार्यालय, गोंदिया येथे गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक प्रदेशाध्यक्षा श्रीमती वैशालीताई नागवडे, खासदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री राजकुमार बडोले, वरिष्ठ नेत्या श्रीमती आभाताई पांडे, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले, प्रदेश उपाध्यक्षा सौ.राजलक्ष्मी तुरकर, जिल्हाध्यक्षा सौ. रजनी गिऱ्हेपुजे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री सुरेश हर्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी संबोधित करतांना खासदार श्री राजेंद्र जैन म्हणाले कि, लोकप्रिय जननेता आदरणीय स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांप्रती जिव्हाळा असलेला नेत्तृत्व हरपला आहे. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या धोरणांवर काम करीत असून स्थानिक स्वराज्य असो किंवा सहकार क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अग्रेसर आहे. पक्षात काम करणाऱ्यांना संधी दिली जात असून पक्षाप्रती निष्ठा व प्रामाणिकपणा ठेवला तर पक्ष खंबीरपणे पाठीशी उभा आहे याची जाणीव कार्यकर्त्यांना आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या निवडणूका असून महिलांच्या नेतृत्वाला संधी देण्याचे काम पक्ष करणार आहे.

महिला प्रदेशाध्यक्षा श्रीमती वैशालीताई नागवडे यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या कि, आदरणीय लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पक्षाची हानी झाली आहे. आदरणीय दादांच्या स्वप्नांची पूर्ती करणे आपली सर्वांची जिम्मेदारी आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत महिलांचे नेतृत्व वाढविण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांचा हातात सत्तेची चाबी असावी याविचाराने आपल्याला प्रयत्न करावे लागेल. आदरणीय सुनेत्राताई पवार, खा. प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात पक्ष वाढीसाठी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आपला पक्षच मानाने स्थान देऊ शकते, कार्यकर्ता हा संघटनेचा कणा आहे आणि म्हणून महिला अनेक क्षेत्रात पुढे येत असल्या तरी ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच काम करेल याची ग्वाही त्यांनी दिली.

आमदार श्री राजकुमार बडोले यावेळी म्हणाले कि, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा चालविणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि यात महिलांचे कर्तृत्वाचा सन्मान राखण्याचे काम केले जाते. पक्षात महिलांचे नेतृत्व घडविण्यात लोकनेते स्व.अजितदादा पवारजी व आमचे नेते खा. श्री प्रफुल पटेलजी यांचे योगदान मोठे आहे.

यावेळी गोंदिया जिल्ह्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्या वरिष्ठ पदाधिकारी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत व परिषदेतील सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version