जिल्हा परीषद शाळा मोरगाव विद्यार्थी दिन साजरा

wartaa.in
Share on

अर्जुनी/मोर-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरगाव येथे विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सु.मो.भैसारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिन साजरा केला जातो . महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी संपूर्ण भारतात ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. विद्वत्ता आणि ज्ञानाचा उच्च दर्जा असूनही, आंबेडकर स्वतःला आजीवन विद्यार्थी मानत असत आणि ते एक आदर्श विद्यार्थी बनल्यामुळे सरकारने त्यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशप्रेम, विज्ञान, शिक्षण व स्वप्ने पूर्ण करण्याविषयी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे मन जिंकले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन मुरगावची तहसीलदार अनिरुद्ध कांबळे आय.टी.आय. कॉलेजचे प्राचार्य जाधव व त्यांचे सहकारी निदेशक, ग्रामपंचायत सरपंच सौ. गीताताई नेवारे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी लोधी, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश लाडे , सोनू ताई कराडे, मुनेश्वर शहारे शुभांगी वाघमारे,व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुकरण करून मोठी स्वप्ने पाहण्याचे व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे यांनी केले तर आभारप्रदर्शन शिक्षिक जितेंद्र ठवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेवानंद उईके ,वामन घरतकर, रुषेश्वर मेश्राम ,अचला कापगते ,रूपाली मेश्राम ,पूजा काळसर्पे आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *