जिल्हा परीषद शाळा मोरगाव विद्यार्थी दिन साजरा
अर्जुनी/मोर-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरगाव येथे विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सु.मो.भैसारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिन साजरा केला जातो . महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी संपूर्ण भारतात ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून…

