डॉ. रक्षित बागडे ग्लोबल टीचर अवॉर्ड ने सन्मानित : शिक्षण क्षेत्रात भंडाऱ्याचा मान उंचावणारी उल्लेखनीय कामगिरी

wartaa.in
Share on

स्व. मन्सारामजी पडोळे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रक्षित मदन बागडे यांना वुमन इंम्पावरमेंट संघ द्वारे आयोजित दि. २६ आणि २७ नोव्हेंबर या दोन दिवसीय 7 वे आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट संमेलन, नागपूर येथे ग्लोबल टीचर अवॉर्ड देवुन सन्मानित करण्यात आले. डॉ. रक्षित बागडे यांनी त्यांच्या 11 वर्षाच्या अध्यापन काळात केलेले 23 पुस्तकांचे लिखाण केले ज्यात, तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक दृष्टीकोन यावर आधारित संदर्भ ग्रंथ आणि शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचा समावेश आहे. अर्थशास्त्र विषयावरील प्रकाशित विविध शोधनिबंध, या सर्व विशेष बाबीची दखल घेऊन श्री. भदंत डॉ. चंद्रकीर्ती, अध्यक्ष महिला सशक्तीकरण संघ यांच्या हस्ते हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या निमित्त डॉ. रक्षित बागडे यांनी सर्व मित्र परिवाराचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *