Palash Muchhal Smriti Mandhana Marriage: पलाश मुच्छलचे गुपित उघड! स्मृती मंधाना लग्नाबाबत थेट बोलला, व्हिडिओने माजवली खळबळ

wartaa.in
Share on

स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंड चित्रपट संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने इंदोरच्या एका कार्यक्रमात मोठी घोषणा करून टाकली आहे. पलाश मुच्छलने इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मंधानासोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे.

Smriti Mandhana Palash Muchhal : भारताची स्टार खेळाडू आणि सांगलीची लेक स्मृती मंधाना सध्या आयसीसी वुमेन्स वर्ल्डकपमध्ये व्यस्त आहे.या दरम्यानच्या स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंड चित्रपट संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलने इंदोरच्या एका कार्यक्रमात मोठी घोषणा करून टाकली आहे. पलाश मुच्छलने इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मंधानासोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे.त्यामुळे आता सांगलीची लेक आता इंदूरची सून होणार आहे. पलाश मु्च्छलने या दरम्यान लग्नाची अद्याप तारीख सांगितली नाही आहे. त्यामुळे हे जोडपं आता कधी लग्न बंधनात अडकतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पलाश मुच्छल हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. पलाश आणि स्मृती मंधाना गेल्या साधारण पाच वर्षापासून एकमेकांना डेट करतायत. या डेटींगनंतर आता दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळेच आज स्टेट प्रेस क्लबच्या रुबरू कार्यक्रमात पलाश मुच्छलने स्मृती मंधानासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा केली आहे.

पलाश मुच्छल यांचा लवकरच ‘राजू बाजेवाला’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबाबत माहिती देत असताना पलाश मुच्छलला त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. पलाशने लग्नाची घोषणा केली. त्याचसोबत कबूल केले की तो लवकरच महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मानधनासोबत लग्न करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *