इराणने केलं इस्रायलवर बॅलिस्टिक आक्रमण, खामेनेईंचा थरकाप उडवणारा इशारा!

wartaa.in
Share on

मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. इराणने इस्रायलवर थेट बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करत मोठ्या प्रमाणावर आक्रमण केलं. ‘ट्रू प्रॉमिस’ या नावाने इराणी क्रांतिकारी गार्ड्सनी राबवलेल्या या ऑपरेशनमध्ये सुमारे 300 पेक्षा अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

या अचानक हल्ल्यामुळे इस्रायलच्या अनेक भागांमध्ये हवाईसिरन वाजू लागले, नागरिकांना बंकरमध्ये स्थलांतरित व्हावं लागलं. इस्रायली लष्करानं अमेरिका, ब्रिटनसह मित्रदेशांच्या मदतीनं हवाई संरक्षण यंत्रणेतून बहुतेक हल्ले निष्प्रभ केले, पण काही क्षेपणास्त्रांनी नुकसान केलं आहे. या हल्ल्यात सध्या तरी 7 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी हल्ल्यानंतर केलेल्या भाषणात म्हटलं, “आम्ही इस्रायलला असहाय्य करू. हा केवळ प्रारंभ आहे.”

हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी देखील देशवासीयांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे आणि परतीचा जबरदस्त प्रत्युत्तर दिलं जाईल, असं स्पष्ट केलं आहे.

या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि जगभरातील प्रमुख देशांनी युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *