नगरपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी आखली ‘विशेष मोहीम’?
साकोली (दि. १७ जून २०२५):
शिवसेना (शिंदे गट) पक्षात आगामी साकोली व सेंदूरवाफा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज विश्रामगृह साकोली येथे एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस नवनियुक्त जिल्हाप्रमुख पदमाकर बावनकर, तसेच साकोली विधानसभा संघटक उमेद घोडसे, बाळाभाऊ शिवणकर, उमेश गायधनी यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत प्रभागनिहाय रणनीती, सदस्य नोंदणी अभियान, आणि पक्ष विस्तार यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
बैठकीस राधेश्याम मुंगमोडे, नरेंद्र वाडीभस्मे, सुरेश गजापुरे, सचिन करंजेकर, विशाल कोसरे, तुषार जांभूळकर, प्रेमराज सोनवाने, धम्मदीप वैद्य, महेंद्र जनबंधू, दीपक उनोने, पुष्पा सोनकुसरे, प्रमिला गोटेफोडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती ही पक्षाच्या वाढत्या ताकदीचे प्रतिक होती.

