आक्रमक आवाजाची शिक्षा! नाना पटोलेंना सभागृहातून बाहेरचा रस्ता

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांना, सभागृहातील आक्रमक वागणुकीमुळे अध्यक्षांनी एक दिवसासाठी निलंबित केलं आहे.
विधानसभेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. याच मुद्द्यावर नाना पटोले यांनी सरकारविरोधात जोरदार आवाज उठवला. त्यांनी थेट सभागृहात अध्यक्षांकडे धाव घेत तीव्र निषेध नोंदवला. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पटोलेंच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दिवसभरासाठी सभागृहाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सत्ताधाऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या, तर विरोधकांनी या निलंबनाला दुजाभावाची वागणूक म्हणून टीका केली.
या घडामोडीमुळे अधिवेशनाचे वातावरण तापले असून, पुढील काही दिवस राजकीय उलथापालथी घडण्याची शक्यता आहे.