गोंदिया जिल्ह्यात आज सर्व शाळांना तात्काळ सुट्टी

गोंदिया जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक लहान-मोठ्या नद्या, नाले ओसंडून वाहत असून गावांचा एकमेकांशी संपर्क तुटल्याच्या घटना समोर येत आहेत.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशानुसार आज दिनांक ८ जुलै २०२५ रोजी गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गटशिक्षणाधिकारी, तालुका BDOs आणि शाळा प्रशासन यांना याबाबत तातडीने सूचित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या अधिकृत पत्रानुसार, ही सुट्टी फक्त एक दिवसापुरती असली तरी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.