आरोग्य शिबिरातून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचा उपक्रम!

अर्जुनी मोरगाव | प्रतिनिधी
गंगाबाई मेमोरियल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि राजकुमार बडोले फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० जुलै २०२५ रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे. हे शिबिर अर्जुनी मोरगाव येथील गंगाबाई हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस समोर, लाखांदूर रोड या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार असून, ग्रामिण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे.
🩺 उपलब्ध राहणाऱ्या सेवा:
स्त्रीरोग तपासणी व सल्ला
जनरल मेडिसिन
कॅन्सर तपासणी (ऑन्कोसर्जरी)
हाडांचे व सांध्यांचे आजार (ऑर्थो)
फिजिओथेरपी
दंत चिकित्सा
रक्त तपासणी व डायग्नोस्टिक सेवा
👩⚕️ सहभागी होणारे तज्ञ डॉक्टर:
डॉ. आकांशा एल. मेश्राम (स्त्रीरोग) – MBBS, MS (KEM Mumbai), Fellowship in Ultrasound
डॉ. महेश चनाप (ऑन्को सर्जन) – MBBS, MS, PDF (Oncosurgery)
डॉ. विवेक नाकाडे (मेडिसिन) – MBBS, MD
डॉ. एन. एम. हरणे (ऑर्थो) – MBBS, MS
डॉ. निखील थुल (फिजिओथेरपिस्ट) – BPTh, MIACP
डॉ. खुशबू बन्सोड (दंत) – BDS, MDS (Periodontist and Implantologist)
🧪 विशेष रक्त तपासणी सुविधा
इतर तपासण्यांवरही विशेष सवलती
👥 शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरीकांची सोय:
शिबिरासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व आशा वर्कर यांना आवर्जून आमंत्रित करण्यात आले असून, त्यांनी गावातील गरजू रुग्णांना याची माहिती देणे अपेक्षित आहे.
शिबिराच्या व्यवस्थेसाठी सद्गुरू नर्सिंग कॉलेज आणि गोंदिया मेडिकल कॉलेज यांच्याकडे औषधे आणि कर्मचारी पुरवठ्यासाठी अधिकृत पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे.
📍 स्थळ: गंगाबाई हॉस्पिटल, लाखांदूर रोड, अर्जुनी मोरगाव
📞 संपर्क: 9422152833 / 8380813180
राजकुमार बडोले फाउंडेशन व गंगाबाई हॉस्पिटल तर्फे सर्व नागरीकांना या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Nice activity