डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ राजकारण्यांचे फोटो – हा अपमान नाही तर नीचपणाचा कळस!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ राजकारण्यांचे फोटो लावले जाणे ही एक साधी चूक नाही, तर समाजाला भ्रमित करण्याचा आणि जनतेसमोर स्वतःला मोठं दाखवण्याचा घाणेरडा प्रकार आहे. संविधानाचे शिल्पकार, मानवतेचे पुरस्कर्ते, वंचितांच्या हक्कांसाठी आजीवन लढा देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची ही इतकी प्रचंड आहे की तिच्या शेजारी कुणाचेही स्थान मुळातच नाही. तरीही नाना पटोले, प्रशांत पडोळे यांचे फोटो बाबासाहेबांच्या प्रतिमेजवळ लावले जाणे म्हणजे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार आहे.
हे कृत्य केवळ अपमानजनकच नाही तर नीचपणाचा कळस आहे. समाजमनाला चीड आणणारा हा प्रकार म्हणजे जणू एखाद्या कुत्र्याच्या शेपटाला नागीण बांधून त्याला नागराज म्हणण्यासारखा हास्यास्पद आणि निंदनीय मूर्खपणा आहे. बाबासाहेब हे विचारांचे, तत्त्वांचे आणि कार्यांचे विराट पर्वत आहेत. त्यांच्या प्रतिमेजवळ स्वतःचे फोटो लावून कोणीही त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही.
यावर भाजप गोंदिया जिल्ह्याचे महामंत्री प्रशांत शहारे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की – “बाबासाहेबांचा वारसा हा जनतेचा आहे, कोणत्याही राजकीय दुकानदाऱ्याचा नाही. त्यांच्या नावाने केवळ फोटो लावून स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही.”
काँग्रेस आमदार नाना पटोले (साकोली), खासदार प्रशांत पडोळे (गोंदिया-भंडारा) तसेच माजी आमदार बनसोड यांनी जर खरोखरच बाबासाहेबांचा सन्मान केला असता तर त्यांच्या विचारांना मूर्त स्वरूप दिलं असतं, सामाजिक समानतेसाठी ठोस पावले उचलली असती. पण ते न करता फक्त फोटो लावून बाबासाहेबांच्या उंचीशी स्वतःला समकक्ष ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न म्हणजे घाणेरड्या निचपणाचा सर्वोच्च प्रकार आहे.
समाजाला आता सावध व्हावं लागेल. अशा प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही. कारण बाबासाहेब हे एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तीचे मालमत्ताच नाहीत. ते संपूर्ण भारताच्या आत्म्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या प्रतिमेजवळ राजकारण्यांचे फोटो लावून केलेली थट्टा म्हणजे समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न आहे.
प्रशांत शहारे पुढे म्हणाले की – “बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल. अशा प्रकारच्या घटनेला आम्ही राजकीय खेळी मानतो आणि समाजाला सावध करत आहोत की बाबासाहेबांचा वारसा हा शुद्ध, पवित्र आणि सर्वांसाठी समान आहे. कोणीही त्याला राजकीय रंग देऊ शकत नाही.”
या घटनेवरून समाजातील अनेक घटकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. बाबासाहेबांच्या तत्त्वांचा अपमान करून, त्यांच्या प्रतिमेच्या शेजारी स्वतःला झळकवण्याचा प्रकार हा केवळ राजकीय नफा-तोट्याचा हिशोब आहे. पण जनता आता जागरूक आहे. बाबासाहेबांच्या कार्याचा वारसा त्यांच्या विचारांनी आणि संविधानाच्या अंमलबजावणीने जपला जाईल, तो फोटोझोप किंवा खोट्या प्रचाराने कधीच नाही.

