२४२ जणांनी भरलेलं विमान थेट वस्तीवर कोसळलं!

wartaa.in
Share on

गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला. २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं एक प्रवासी विमान थेट रहिवासी भागात – मेघाणीनगर परिसरात – कोसळलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दुर्घटना इतकी भीषण होती की आवाज दूरवर ऐकू आला. अनेक घरांचे छप्पर उडाले, तर काही घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अपघातानंतर आग लागली असून बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आलं आहे. अग्निशमन दल, पोलिस, आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रारंभी मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला, पण विमान थेट वस्तीवर कोसळलं. मृतांच्या व जखमींच्या संख्येबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

संपूर्ण देशातून या दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटद्वारे शोक व्यक्त केला असून, याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *