आकाशातली थरारक दहशत! एअर इंडिया फ्लाइटचे फुकेतमध्ये आपत्कालीन लँडिंग

wartaa.in
Share on

फुकेत (थायलंड): एअर इंडिया कंपनीच्या मुंबईहून फुकेतकडे जाणाऱ्या फ्लाइट AI-379 मध्ये अचानक बॉम्ब असल्याचा इशारा मिळाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. विमान havेत असताना मिळालेल्या या अलर्टमुळे वैमानिकांनी तातडीने निर्णय घेत फ्लाइटचं फुकेत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

या फ्लाइटमध्ये २२६ प्रवासी आणि ११ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. लँडिंगनंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. प्रवाशांना तात्पुरत्या स्वरूपात विमानतळावर थांबवण्यात आलं होतं.

थायलंडच्या सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बच्या इशाऱ्याची पुष्टी अद्याप झाली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरु असून हा इशारा खोटा होता का, याचा तपास सुरु आहे.

या घटनेमुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला. काही प्रवासी सोशल मीडियावरून आपला अनुभव शेअर करत असताना अनेकांनी फ्लाइट क्रूचं शांत वागणं आणि तत्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

एअर इंडिया कंपनीनेही अधिकृत निवेदन देत सांगितलं की, सर्व प्रवासी सुरक्षित असून, ही घटना कंपनी गंभीरतेने घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *