गगन मल्लिक यांच्या उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार

wartaa.in
Share on

गोंदिया, जुलै 2025 — गोंदिया शहरात आषाढ पौर्णिमा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम साजरा होणार आहे. 10 जुलै 2025 रोजी साजरी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर, 6 आणि 7 जुलैला दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने थायलंडहून प्राप्त झालेल्या पवित्र बुद्धमुर्तीचे वितरण धम्मदूत गगन मल्लिक यांच्या हस्ते व आदरणीय भिक्षु डॉ. तिलकसिंह महारथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

पहिला कार्यक्रम 6 जुलै रोजी पाटलिपूत बुद्ध विहार, गोंदिया येथे सकाळी 11 वाजता भिक्षु संघाच्या सामूहिक भोजनदानाने सुरू होईल. तर सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बुद्ध मूर्तींची प्रतिष्ठापना होईल.

दुसऱ्या दिवशी, 7 जुलै रोजी नवगठित धम्मज्योती बुद्ध विहार, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे बुद्धवंदना आणि विविध भिक्षुंनी मार्गदर्शन करणार आहेत.

धम्मदूत गगन मल्लिक यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *