उड्डाणपुलावर अचानक काळ आला धावत… कुटुंबावर घात

भंडारा जिल्ह्यातील उड्डाणपुलावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. एका होंडा सिटी कारने भरधाव वेगात येत दुचाकीस्वार कुटुंबाला चिरडले. या भीषण घटनेत पती-पत्नी आणि त्यांची दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. अपघात इतका भयानक होता की आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केलं.
ही घटना भंडाऱ्याच्या बायपास उड्डाणपुलावर घडली. दुचाकीवरून जात असलेल्या कुटुंबावर भरधाव होंडा सिटीने पाठीमागून धडक दिली. यामध्ये सर्वांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार चालक कोण होता, नेमकी चूक कुणाची होती याचा तपास पोलिस घेत आहेत. मात्र, ह्या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.