मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त साकोलीत भाजपाचे विशेष कार्यक्रम

साकोली / सेंदुरवाफा —
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारला यशस्वी ११ वर्ष पूर्ण होत आहेत. “संकल्प ते सिद्धी” या संकल्पनेखाली देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा साकोली / सेंदुरवाफा शहर मंडळाच्यावतीने स्थानिक पातळीवरही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष आशुभाऊ गोंडाने यांच्या आदेशानुसार या उपक्रमांची जबाबदारी व नियोजन निश्चित करण्यासाठी विशेष बैठक गुरुवारी, १९ जून २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता शासकीय विश्रामगृह, साकोली येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस साकोली व सेंदुरवाफा शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा शहर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
बैठकीचे निमंत्रक:
🔹 श्री. व्यंकटेश येवले – अध्यक्ष, भाजपा साकोली / सेंदुरवाफा शहर मंडळ
🔹 श्री. शंकर हातझाडे – अध्यक्ष, भाजपा सेंदुरवाफा शहर
🔹 सौ. प्रीतीताई डोंगरवार – अध्यक्षा, भाजपा साकोली / सेंदुरवाफा शहर