४० अपघात… आणि एक पोस्टर! हैदराबादमध्ये अभिनेत्रीच्या मादक जाहिरातीने केला थरकाप

wartaa.in
Share on

हैदराबाद शहरातील एक विचित्र आणि धक्कादायक घटना चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या ‘वेदम’ या चित्रपटातील बोल्ड पोस्टरमुळे तब्बल ४० अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अखेर पोलिसांनी त्या पोस्टरला हटवण्याचा निर्णय घेतला.

ही घटना हैदराबादमधील एका अतिवर्दळीच्या रस्त्यावर घडली. रस्त्याच्या कडेला लावलेलं हे पोस्टर इतकं लक्षवेधी होतं की वाहनचालकांचं लक्ष भरकटून अपघात घडू लागले. विशेष म्हणजे, या पोस्टरमध्ये अनुष्का शेट्टी एका मादक पोझमध्ये दिसत आहे, ज्यात तिने पिवळ्या साडीतून केलेलं सेक्सी फोटोशूट झळकत होतं.

‘वेदम’ हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. या तेलुगु सिनेमात अनुष्काने एका सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं, मात्र आता याच चित्रपटातील पोस्टरमुळे हैदराबादमध्ये जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली.

पोस्टरमुळे अपघातांची मालिका सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या. पोलिसांनी तपास करताच स्पष्ट झालं की अपघात आणि पोस्टर यांचा थेट संबंध आहे. यामुळे त्यांनी तात्काळ ते पोस्टर हटवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *