BSNL नेटवर्क गायब…! नवेगावबांधकरांना दोन दिवसांचा डिजिटल स्ट्राइक
नवेगावबांध परिसरातील BSNL ग्राहकांना गेले दोन दिवसांपासून मोबाइल नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद असल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. अचानक सेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना कॉल, इंटरनेट व OTP सेवा यांचा उपयोग करता येत नसून अनेकांचे महत्वाचे व्यवहार अडकल्याची माहिती समोर आली आहे.
BSNL नेटवर्क अचानक बंद पडल्यामुळे शासकीय कार्यालये, रेशन दुकानं, बँक व्यवहार तसेच शाळा-कॉलेजमधील ऑनलाईन कामकाज ठप्प झालं आहे. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी ही सेवा म्हणजे एकमेव पर्याय असल्याने संतापाची लाट पसरली आहे.
स्थानिक नागरिकांनी BSNL अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कुठलाही स्पष्ट खुलासा मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन सेवा सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
“BSNL व्यस्त – ग्राहक त्रस्त” ही स्थिती पुन्हा समोर येते आहे.

