कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर खासगी विक्रीचा संशय, स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी!

लाखांदूर (ता. 17 जून) – लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मोकळ्या जागेचा कथितपणे खासगी विक्रीसाठी विचार सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख विनोद धोपटे यांनी समितीच्या सचिव आणि सभापतींना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, लाखांदूरच्या बाजार समितीच्या 7 एकर जागेतील 2 एकर जागेवर मार्केटिंग यार्ड विकसित करण्यात आले असून उर्वरित जागेवर कोणत्याही प्रकारची विकासकामे अद्याप झालेली नाहीत. तरीही काही खासगी व्यक्तींना जागा देण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बाब चुकीची असून, जागा वितरणाआधी ती सार्वजनिकरित्या जाहीर करावी आणि आवश्यकतेनुसार केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरावी, अशी मागणी करण्यात आली.