दलाई लामा यांचा ९०वा वाढदिवस साजरा

अर्जुनी मोरगाव | तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त नार्ग्यलॉन्ग तिबेटी वसाहतीत एक भावनिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात केक कटिंगने झाली, ज्यानंतर तिबेटी व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची अनोखी रेलचेल पाहायला मिळाली. रंगीत पारंपरिक वेशभूषा, नृत्य व संगीताच्या सादरीकरणांनी उपस्थितांचे मन जिंकले.
या विशेष कार्यक्रमाला गोंदियाचे जिल्हाधिकारी, ॲडिशनल एस.पी., अर्जुनी मोरगावचे SDM व तहसीलदार, नागपूरचे शशिकांत जांभुळकर, साकोलीचे राकेश भास्कर आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दलाई लामा यांच्या जागतिक योगदानाला मानवंदना दिली.
दलाई लामा हे केवळ तिबेटी जनतेचे धर्मगुरू नसून, ते संपूर्ण मानवजातीसाठी शांततेचा व करुणेचा संदेश देणारे महानायक आहेत. त्यांच्या जीवनकार्याने माणसाला अंतर्मनातील शक्ती, क्षमा व दयाळूपणाचा मार्ग दाखवला.