आमदार बडोले यांना रोजगारावरून निवेदन
सडक अर्जुनी | प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची रोजगारासाठी असहाय्यता आता थेट आमदार दरबारी पोहोचली आहे. महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन, तालुका-सडक अर्जुनीच्या वतीने अध्यक्ष सुमित अग्रवाल आणि सचिव भाग्यश्री बोरकर यांच्या नेतृत्वात, आमदार राजकुमार बडोले यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले की, अनेक अभियंते जिल्हा उद्योग केंद्र, गोंदिया येथे नोंदणीकृत असूनही त्यांना स्थानिक शासनाच्या किंवा शासनमान्य विविध प्रकल्पांमध्ये रोजगाराच्या संधी मिळालेल्या नाहीत. स्थानिक युवकांच्या रोजगारासाठी विविध उपक्रमांत सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेषतः “तालुका स्थापत्य अभियंता संघटना, सडक अर्जुनी” व “स्थापत्य अभियंता संघटना अर्जुनी/मोर” या स्थानिक संघटनांना भविष्यातील विकासकामांमध्ये संधी देण्यात याव्यात अशीही विनंती या पत्राद्वारे करण्यात आली.

