IRCTC तात्काळ तिकीटसाठी ‘आधार’ लिंक करणे झाले अजून सोपे! जाणून घ्या काय आहे नवीन पद्धत

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी एक दिलासा देणारी सुविधा सुरू केली आहे. अनेक प्रवाशांसाठी तात्काळ तिकीट काढणे म्हणजे मोठं आव्हान असतं. मात्र आता IRCTC तात्काळ तिकीट बुक करताना आधार कार्ड ऑथेंटिकेशन करण्याची प्रक्रिया खूपच सोपी केली गेली आहे.
आधार लिंक नसेल, तरीही आता IRCTC वापरकर्ते एका क्लिकमध्ये आपले KYC अपडेट करू शकतात. त्यासाठी फक्त तुमचं मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं गरजेचं आहे.
IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अॅपवर लॉगिन करून ‘My Account’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Aadhaar KYC’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर, OTP च्या सहाय्याने तुमचं आधार कार्ड लिंक होईल.
या प्रक्रियेनंतर तुम्ही तात्काळ तिकीटसाठी 6 ऐवजी 12 प्रवाशांचे बुकिंग करू शकता. शिवाय, इतर सुविधाही मिळतील.
रेल्वेने ही सुधारणा 2025 मध्ये लागू केली असून, याचा उद्देश तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता व वेग आणणे आहे.