शेळीपालनावर 90% अनुदान! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी – अर्जाची प्रक्रिया पहा

शेतीपूरक व्यवसायांमध्ये शेळीपालन हा एक अत्यंत फायदेशीर पर्याय मानला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. सध्या एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे – शेळीपालनावर तब्बल 90% अनुदान देण्यात येणार आहे!
होय, अगदी खरं! शेळीपालन योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणार असून, शेळ्यांची खरेदी, गोठा उभारणी, चारा व्यवस्थापन आदी बाबींकरिता 90 टक्के खर्च सरकार भरून काढणार आहे.
काय आहे अर्ज प्रक्रिया?
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://ahd.maharashtra.gov.in/en/sgr-stall या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक खाते तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि स्थानिक ग्रामसेवकाची शिफारस आवश्यक आहे.
कोण पात्र आहे?
▪️ शेतकरी, महिला बचतगट सदस्य
▪️ किमान 18 वर्षे वयाचे अर्जदार
▪️ स्थानिक ग्रामपंचायतीची मंजुरी असलेले अर्जदार
अनुदानाची रक्कम
योजनेअंतर्गत 10 शेळ्या व 1 बोकड यासाठी लागणारा खर्च अंदाजे 1 लाख रुपये आहे. यामध्ये 90,000 रुपये अनुदान दिले जाईल आणि उर्वरित 10,000 अर्जदाराने भरायचे आहे.
शेळीपालनाचे फायदे
शेळीचे मांस, दूध, शेणखत, तसेच शेळ्यांची विक्री करून चांगला नफा मिळवता येतो. अल्पभांडवली व्यवसाय असून उत्पन्न हमखास मिळते.
ही सुवर्णसंधी गमावू नका! आजच अर्ज करा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा!
