गोंदिया जिल्हा परिषद रुग्णवाहिका सेवेत दाखल

गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नव्याने खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. गोंदिया जिल्हा परिषद रुग्णवाहिका आजपासून अधिकृतपणे सेवेत दाखल करण्यात आल्या असून, जिल्हा परिषद भवनातून हिरवा झेंडा दाखवून या रुग्णवाहिकांना सेवा क्षेत्रात रवाना करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हा परिषद अध्यक्ष असेलायकराम भेंडारकर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “ग्रामीण जनतेला वेळेवर व सुलभ आरोग्यसेवा मिळावी यासाठी या नव्या रुग्णवाहिका उपयुक्त ठरणार आहेत.”
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगनाथम, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले, बांधकाम सभापती लक्ष्मण भगत, समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे, महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, पशु व कृषी सभापती दीपा चंद्रिकापुरे हे उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे, सविता पुराम, माधुरी रहांगडाले, हनवंत वटी, चतुर्भुज बिसेन, यशवंत गणवीर, जगदीश बावनथडे, संदीप भाटिया यांचीही उपस्थिती लाभली.
आरोग्य विभागातर्फे डॉ. अरविंद वाघमारे (अति. आरोग्य अधिकारी), प्रमोद काळे (सहाय्यक प्रशासन अधिकारी), सुभाष खत्री (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) हे मान्यवरही उपस्थित होते.
या नव्या रुग्णवाहिकांच्या सेवेत समावेशामुळे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षम होणार आहे. अपघात, प्रसूती किंवा तातडीच्या केसमध्ये ही वाहने रुग्णांना वेळेत उपचार केंद्रात पोहोचवण्यासाठी मोलाची मदत ठरणार आहेत.