गोसेखुर्द धरणाचे दोन दरवाजे उघडले; पाण्याचा विसर्ग कमी, पण धोका कायम!

गोसेखुर्द धरणाचे केवळ दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले असून सध्या 13,683 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कालपर्यंत तब्बल 15 दरवाजे सुरू होते, मात्र आता विसर्गात 48,456 क्युसेकने घट करण्यात आली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता धरण प्रशासनाने वर्तवली आहे.
सद्यस्थितीत धरणाची पातळी आणि हवामानाच्या अंदाजावर प्रशासन बारकाईने नजर ठेवून आहे. नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.