गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांची लाचखोरी — अर्जुनी मोर प्रकरणाबरोबरच २००९ ची पार्श्वभूमीही चर्चेत
अर्जुनी मोर | Wartaa प्रतिनिधी
अर्जुनी मोर तालुक्यातील केवळराम विद्यालय परसटोला येथील तपासणीप्रकरणी गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी ₹२०,००० लाच मागितल्याचा VIDEO प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र आजच्या या आरोपांपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्यावर २००९ च्या भ्रष्टाचाराचा मालवा होता, आणि तो आता पुन्हा चर्चेत आला आहे.
पार्श्वभूमी
२००९ मध्ये गडचिरोलीतील Anti-Corruption Bureau (ACB) ने राजुरा येथील ZP कनिष्ठ महाविद्यालयातील DEd परीक्षा केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या Anil Chavan यांना DEd परीक्षेत कॉपीसाठी ₹5,000 लाच घेताना रंगेहात पकडले होते. ही घटना 17 सप्टेंबर 2009 रोजी Times of India या राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झाली असून, ACB ने त्यांना छापा उडवून अटक केली होती .
सध्याची – अर्जुनी मोरमधील लाचखोरी
संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी केवळराम विद्यालय, परसटोला येथील शालेय तपासणीदरम्यान २५ हजार रुपयांची लाच मागितली, जी नंतर २० हजार रुपये करण्यात आली.
परंतु वीस हजार रुपये पैकी केवळ पाच हजार रुपये लिफाफ्यात असल्यामुळे तो पैशाच्या लिफाफा खाली फेकून आणि फाईलवर सही न करण्याची धमकी देऊन त्यांनी वर्तन केले.
या गंभीर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ACB कडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संस्था व समाजाची प्रतिक्रिया
शिक्षण व्यवस्थेतील विश्वास गळून जाताना दिसत आहे. लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दाखवली आहे. “जर अधिकाऱ्यांनीच भ्रष्टाचार केला, तर विद्यार्थी आणि शाळांचं काय?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनिल चव्हाण यांच्यावर तात्काळ कारवाई आणि निलंबन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

