प्रा. होमराज कापगते यांचा सत्कार
प्रा. होमराज कापगते यांचा आज दिनांक ३० जुलै २०२५ रोजी श्री साई ग्रामीण पतसंस्था साकोलीच्या कार्यालयात उत्साहात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला निमित्त ठरली भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील सहकार पॅनलची ऐतिहासिक कामगिरी. या निवडणुकीत सहकार पॅनलने मोठा विजय मिळवून भंडाऱ्याच्या सहकार क्षेत्रात नव्या इतिहासाची नोंद केली आहे, तर जांभळी येथील प्रा. होमराज कापगते यांनी आपली विजयी घौडदौड कायम ठेवत संचालक म्हणून निवड जिंकली आहे.
श्री साई ग्रामीण पतसंस्थेच्या साकोली येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष, संचालक, कर्मचारी वर्ग आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. विजयानंतर होणारा हा सत्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याला आणि सहकार चळवळीतील योगदानाला दिलेली एक प्रकारची मान्यता म्हणता येईल.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती संचालक किशोर डोये, दामोदर कापगते, नितीन बावनकर, धनंजय डोंगरवार, शैलेश गजभिये, भास्कर भेंडारकर, राजेश सूर्यवंशी, नानेश्वर लोधीकर, घनश्याम वलथरे यांनी दर्शवली. तसेच संचालिका कु. अर्चना बावणे आणि सौ. सुनिता वाडीभस्मे यांचीही उपस्थिती कार्यक्रमास विशेष उर्जा देणारी ठरली.
कर्मचारी वर्गात भागवत मेश्राम, शरद ब्राम्हणकर, विनोद ठाकूर, अनिल कापगते व घनश्याम राऊत यांनी संयोजनात मोलाचा वाटा उचलला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक राजेश सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश गजभिये यांनी केले.
कार्यक्रमात प्रा. कापगते यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी सहकार पॅनलच्या यशामागील नियोजन, संघभावना आणि जनतेचा विश्वास यांचा आवर्जून उल्लेख केला.
हा सत्कार कार्यक्रम केवळ सन्मानाचे क्षण नव्हते, तर सहकार पॅनलच्या पुढील वाटचालीसाठी ऊर्जा देणारा, संघबांधणीचा आणि प्रेरणेचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

