Apple ची चीनमधून एक्झिट
भारत बनला US स्मार्टफोन पुरवठ्यात नंबर वन – Samsung चं वाढलेलं साम्राज्य आणि ट्रेड वॉरचा नवा अध्याय!
2025 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताने पहिल्यांदाच चीनला मागे टाकून अमेरिकेच्या स्मार्टफोन पुरवठ्यात नंबर वन स्थान मिळवलं आहे, आणि यामागे सर्वात मोठा हात आहे Apple च्या चीनमधून बाहेर पडण्याचा निर्णयाचा.
Apple चं “China Plus One” स्ट्रॅटेजी गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे, पण 2025 मध्ये या धोरणानं खराखुरा आकर घेतला. Canalys या मार्केट रिसर्च कंपनीच्या अहवालानुसार, 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा अमेरिकेतील स्मार्टफोन एक्सपोर्टमध्ये केवळ 13% वाटा होता, जो आता 44% पर्यंत पोहचला आहे – म्हणजे तब्बल 240% वाढ!
दुसरीकडे चीनच्या मार्केट शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे – 61% वरून थेट 25% पर्यंत. हे फक्त आकड्याच नाहीत, तर जागतिक सप्लाय चेनचा बदलता परीघ दर्शवणारे गंभीर संकेत आहेत.
📦 भारतात प्रोडक्शनवाढ: Apple चा मोठा विश्वास
Apple चे CEO Tim Cook यांनी यापूर्वीच म्हटलं होतं की 2025 च्या Q2 मध्ये अमेरिका विक्रीसाठी जाणाऱ्या बहुतांश iPhones भारतात तयार होतील. आणि असंच झालं – भारतात iPhone प्रोडक्शनमध्ये 53% वाढ झाली आहे आणि एकूण उत्पादन 23.9 दशलक्ष युनिट्सवर पोहचलं आहे. आता भारतात सर्व प्रकारचे iPhones – अगदी प्रीमियम Pro मॉडेल्ससुद्धा – तयार केले जात आहेत.
📉 पण बाजारात Apple ची घट, Samsung ची उसळी
अद्रुष्य आर्थिकदृष्ट्या हे एक संक्रमण टप्पा वाटू शकतो. Q2 2025 मध्ये जरी भारतातून iPhone निर्मिती झाली असली, तरी Apple च्या US मधील शिपमेंट्समध्ये 11% घट झाली, आणि त्या जागी Samsung ने 38% ची उसळी घेतली, 8.3 दशलक्ष युनिट्स विकून. Samsung चं बजेट Galaxy A सीरीज सध्या US मार्केटमध्ये तुफान गाजत आहे.
सध्याच्या घडीला Apple चं मार्केट शेअर 49% आहे, पण Samsung आता 31% वर पोहचत आहे – म्हणजे दोघांमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी होतंय.
🌐 सप्लाय चेनचे अंतरंग – व्हिएतनाम देखील फायदेशीर
भारताचा उत्थान फक्त Apple सोबतच नाही. व्हिएतनामचा वाटा देखील 24% वरून 30% वर गेला आहे. म्हणजे संपूर्ण सप्लाय नेटवर्क आता एका देशावर अवलंबून न राहता पसरले जात आहे.
विश्लेषक Runar Bjorhovde म्हणतात, “ट्रेड टॅरिफ्स आल्यास मोठा आर्थिक फटका बसेल, त्यामुळे कंपन्या आधीच फॉरवर्ड प्लॅनिंग करत आहेत आणि इन्व्हेंटरी वाढवत आहेत.”

