भारतीय लष्करात थेट भरतीची सुवर्णसंधी; आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय खेळाडूंना हवलदार आणि नाईब सुभेदार पदासाठी संधी!

wartaa.in
Share on

नवी दिल्ली – भारतीय लष्कराने अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला खेळाडूंकरिता थेट भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. 04/2025 या खेळाडू कोट्यामधील भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना हवलदार आणि नाईब सुभेदार (Direct Entry) पदांसाठी थेट निवड चाचणीमध्ये सहभागी होता येणार आहे.

या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराने 1 एप्रिल 2023 नंतर आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स / युवा गेम्स यामध्ये सहभागी झालेला असावा. अर्जदारांनी जाहिरातीत दिलेला अर्ज प्रिंट करून सर्व शैक्षणिक व खेळाचे प्रमाणपत्रांसह लष्करी क्रीडा नियंत्रण मंडळाच्या अधिकृत पत्त्यावर पाठवावा.

कुठल्या खेळाचे पात्रता मानले जाणार?

अ‍ॅथलेटिक्स, आर्चरी, बास्केटबॉल, बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक, हॉकी, हँडबॉल, ज्युडो, कयाकिंग आणि कॅनोईंग या खेळातील विविध इव्हेंट्ससाठी ही भरती खुली आहे.


सूचना आणि सावधगिरी:
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून कोणतेही शुल्क अथवा दलाल यांची आवश्यकता नाही. फसवणूक टाळा आणि अधिकृत पत्त्यावरच अर्ज पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *