वैनगंगा नदीच्या पुलावर बिबट्याचे पिल्लू! रात्रीच्या अंधारात चुकलं जंगलाचं रस्ता

भंडारा – जंगलातील वाट चुकलेलं बिबट्याचं पिल्लू शुक्रवारी रात्री थेट वैनगंगा नदीवरील पुलावर येऊन पोहोचलं. रात्रीचा अंधार, पुलावरून धावणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि त्यात हे पिल्लू गोंधळून गेले. एक कार येताना दिसताच ते घाबरून सैरावैरा धावू लागले. या क्षणाचा व्हिडीओ कारचालकाने चपळाईने शूट केला आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडीओ पाहून अनेकांनी अंदाज बांधले की हे वाघाचं बछडं आहे की बिबट्याचं पिल्लू? मात्र वनविभागाकडून प्राथमिक माहिती नुसार ते बिबट्याचं पिल्लू असल्याचं मानलं जात आहे.
ही घटना केवळ कुतूहल निर्माण करणारी नसून, वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यातील सीमारेषा किती धूसर झाल्या आहेत, याचं हे एक गंभीर उदाहरण आहे. आता हे वन्यप्राणी गावाच्या दारात पोहोचत आहेत, आणि यामुळे प्रशासन व वनविभागासाठी नवा प्रश्न निर्माण झाला आहे.