हिंदी सक्तीला मराठीचा जोरदार विरोध

wartaa.in
Share on

हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी जनतेचा संघर्ष अखेर फळाला आला असून सरकारने माघार घेतली आहे. आज मुंबईत मराठी माणसांचा भव्य विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करून या लढ्याचे स्मरण करत एक दिलगिरी व्यक्त केली.

“हिंदी सक्तीच्या विरोधात उभं राहिलेल्या सर्व मराठी वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रं, संस्था, दबावगट आणि कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. भाषणात त्यांचा उल्लेख राहिला, त्याबद्दल दिलगीर आहे,” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

या यशानंतर त्यांनी पुढे म्हटले, “एकजूट अशीच कायम राहावी.”

मराठी अस्मिता आणि भाषेसाठी एकजूटीनं उभं राहणाऱ्या प्रत्येकाचा हा विजय आहे. सरकारला निर्णय मागे घ्यावा लागणं हीच या लढ्याची सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *