अरण्याचं गूढ उलगडणारा ऋषी गेला…

मारुती चितमपल्ली सर काळाच्या पडद्याआड
नवेगाव बांध परिसर आणि पर्यावरणप्रेमी समाजासाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी आहे. निसर्ग आणि वन्यजीवनाचे अचूक निरीक्षक, शब्दांमधून जंगलाचा आत्मा जिवंत करणारे, आणि ‘अरण्य ऋषी’ म्हणून ओळखले जाणारे मा. मारुती चितमपल्ली सर यांचे आज दुःखद निधन झाले.
चितमपल्ली सरांनी नवेगाव राष्ट्रीय उद्यानात राहून इथल्या जैवविविधतेचा अभ्यास केला. त्यांच्या सखोल लिखाणातून जंगल, प्राणी, पक्षी आणि निसर्गातील बारकावे अगदी सामान्य माणसांपर्यंत पोहोचले. त्यांच्या कार्यामुळे नवेगाव बांध केवळ एक पर्यटनस्थळ न राहता, निसर्गप्रेमींसाठी श्रद्धास्थान बनले.
त्यांच्या निधनाने नवेगाव बांध परिसराने एक विचारवंत, पर्यावरणस्नेही आणि सच्चा निसर्गसेवक गमावला आहे.
नवेगाव बांध परिवाराकडून या थोर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.