मोतीरामजी फाये यांचे दुःखद निधन

साकोली – प्रगती कॉलनी येथील रहिवासी आणि दिलीप डुंभरे सर यांचे सासरे मोतीरामजी फाये यांचे दिनांक १० जून २०२५ रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोतीरामजी हे साकोली परिसरात एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. समाजाभिमुख स्वभाव, मनमिळावूपणा आणि सौम्य वृत्तीमुळे त्यांना स्थानिकांमध्ये विशेष आदर होता. त्यांच्या निधनामुळे सामाजिक वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दिनांक ११ जून २०२५ रोजी दुपारी ११:०० वाजता कुंभळी घाटावर करण्यात येणार आहेत. या वेळी कुटुंबीयांनी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.