पुण्यातील मुस्लिम व्यक्तीची वारकऱ्यांसाठी अनोखी सेवा

wartaa.in
Share on

पुणे – वारी म्हटलं की भक्तिभाव, टाळ-चिपळ्यांचा गजर आणि संतांच्या मार्गावर चालणाऱ्या वारकऱ्यांची अखंड श्रद्धा. या वारकऱ्यांना कोण कोण सेवा देतं, याचे कितीतरी उदाहरणं पाहायला मिळतात. पण या साऱ्यांत एक नाव वेगळं ठसठसून उठतं – इस्माईल शेख.

होय, इस्माईल शेख हे पुण्यातील मुस्लिम व्यक्ती असून गेली तीन दशके ते पंढरपूर वारीच्या काळात वारकऱ्यांची पायांची मालिश करत आहेत. धर्मापलीकडचं हे प्रेम, ही सेवा पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू येतात. कोणताही मोबदला न घेता ते वारकऱ्यांचे पाय दाबतात, त्यांचं दुखणं समजून घेतात आणि समाधानाने ‘जय हरि विठ्ठल’ म्हणतात.

त्यांचं म्हणणं आहे, “ही माझी सेवा आहे. विठ्ठलभक्तांच्या थकलेल्या पायांना विश्रांती देणं, हेच माझं भाग्य आहे.” त्यांच्या या कार्यातून सामाजिक सलोख्याचं अत्यंत सुंदर उदाहरण घडतंय. वारी फक्त हिंदूंची नव्हे, तर माणुसकीच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाची आहे, हे इस्माईल शेख सिद्ध करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *