एकनाथ शिंदेंचा ‘बाप’ टोला!”

wartaa.in
Share on

मुंबई: विधानसभेत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं आक्रमक रूप पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांवरील विधानानंतर पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेच्या अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं.

या घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करत, “मोदींवर टीका करून चर्चेत राहता येतं, म्हणूनच नाना पटोले हे असं वागतात,” असा आरोप केला. शिवाय, “बाप तो बाप होता है” असं म्हणत त्यांनी पटोले यांना चिमटा काढला.

शिंदे पुढे म्हणाले की, “विधानसभेत गोंधळ घालणं आणि पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणं ही संसदीय परंपरेला शोभणारी वर्तणूक नाही.” दरम्यान, राज्याच्या राजकारणात या घटनेने एकच खळबळ उडवून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *