राष्ट्रवादी विचार मंथन सभा आणि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव श्री. राजेंद्रजी जैन यांची अध्यक्षपदी, तर आमदार राजकुमार बडोले व राका युवक जिल्हाध्यक्ष केतनजी तुरकर यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या विचार मंथन सभेला आणि सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातील विविध आघाड्यांवरील नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमभाऊ रहांगडाले (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) होते.
महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, युवक जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, इतर मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष डी. यु. रहांगडाले, तालुकाध्यक्ष अविनाश काशीवार, नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्षा वंदनाताई डोंगरवार, जि.प. सदस्या सुधाताई रहांगडाले, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, नगरपंचायत बांधकाम सभापती आनंदकुमार अग्रवाल, पाणीपुरवठा सभापती शशिकलाताई टेंभुर्णे, नगरसेवक देवचंद तरोणे, नगरसेविका शाहिस्ता शेख, दीक्षाताई भगत, कामिनीताई कोवे, माजी जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, माजी संचालक गजानन परशुरामकर, अजय लांजेवार, कृषी सेल तालुकाध्यक्ष देवाजीबापू बनकर, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष सुधाकर पंधरे, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष मतीन शेख यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अविनाश काशीवार यांनी केले. सूत्रसंचालन महिला तालुकाध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे यांनी तर आभार प्रदर्शन युवक तालुकाध्यक्ष दिनेश कोरे यांनी केले.
कार्यक्रमात राजेंद्रजी जैन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेत सत्ता परिवर्तन कसे घडून आले, त्यामागची रणनीती, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग याबाबत देखील विचारमंथन करण्यात आले.
आमदार राजकुमार बडोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “ही निवड म्हणजे केवळ एक पद मिळवणे नाही, तर ग्रामीण विकासासाठी आर्थिक संधींचा नवा मार्ग उघडणारा एक निर्णय आहे.”
या कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये नवा उत्साह दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गोंदिया जिल्ह्यातील संघटनात्मक बळ यानिमित्ताने अधिक दृढ झाले असल्याचे चित्र होते.

