नरेंद्र मोदींनी निवृत्ती घ्यावी! गडकरी पंतप्रधान व्हावेत – नागपूरच्या नेत्याचे धक्कादायक पत्र

wartaa.in
Share on

नरेंद्र मोदी निवृत्ती, नितीन गडकरी पंतप्रधान अशी मागणी करत शिवसेनेकडून भाजपमध्ये गेलेल्या नागपूरचे जेष्ठ नेते किशोर तिवारी यांनी थेट आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांना एक उघड पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता बाजूला व्हावे व गडकरींसारख्या अनुभवी, संवेदनशील आणि लोकमानसात लोकप्रिय असलेल्या नेत्या नितीन गडकरींना देशाचा पंतप्रधान करण्याचा आग्रह धरला आहे. हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरले आहे.

किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, मोदी सरकारच्या कार्यकाळात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सामाजिक ताणतणाव आणि संविधानिक संस्था अशा अनेक क्षेत्रांत अपयश दिसून येत आहे. त्यामुळे समाजातील मोठा वर्ग अस्वस्थ असून देशाला आता एका नव्या नेतृत्वाची गरज आहे. त्यांनी पुढे म्हणाले की, मोदींनी देशासाठी मोठे काम केले असले तरी आता त्यांनी सन्मानाने निवृत्ती स्वीकारून संघ परिवारातीलच पण आपल्या सर्वसमावेशक स्वभावासाठी ओळखले जाणारे, नागपूरचे लोकप्रिय खासदार नितीन गडकरी यांच्याकडे पंतप्रधानपदाची धुरा सोपवावी.

त्यांनी आपल्या पत्रात उल्लेख केले आहे की, नितीन गडकरी हे विकासकामे, रस्ते, पायाभूत सुविधा, शाश्वत ग्रामीण धोरणे आणि सर्वधर्मसमभाव अशा मुद्द्यांवर नेहमीच स्पष्ट भूमिका घेत असतात. देशभरातील शेतकरी, व्यापारी, युवक आणि बुद्धिजीवी वर्ग गडकरींना एक तटस्थ, निर्णयक्षम आणि धर्मनिरपेक्ष नेता म्हणून पाहतात. यांनी मोदींशी तुलना करताना म्हटले की, मोदींसोबत २०१४ आणि २०१९ मध्ये जे अपेक्षित होते, “अच्छे दिन” चे स्वप्न, ते खऱ्या अर्थाने पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी उलट परिणाम दिसून येताहेत. त्यामुळे आता बदल गरजेचा आहे.

ते पुढे म्हणतात की, संघाने देशाच्या हितासाठी एक दूरदृष्ट्या निर्णय घेतला पाहिजे. मोदी यांची निवृत्ती आणि गडकरी यांचे पदार्पण एक सकारात्मक बदलाचे प्रतीक ठरेल. राष्ट्रसंत टुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांची उदाहरणे देत त्यांनी सांगितले की समाजातील तळागाळातील लोकांची अवस्था सुधारायला हवी व त्यासाठी एक प्रामाणिक, पायाभूत विकासावर आधारित नेतृत्व हे काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *