प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनात नागपूरात चिंतनमेळावा

नागपूर : अलीकडेच चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या ऑपरेशन सिंधू या प्रकरणानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली घडत आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रकरणामागील वास्तव समजून घेण्यासाठी आणि आगामी धोरणात्मक वाटचालीवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये एक विशेष विचारमंथन सत्र आयोजित करण्यात आलं आहे.
प्रसिद्ध विचारवंत आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे या कार्यक्रमात मार्गदर्शन लाभणार आहे. “ऑपरेशन सिंधू आणि नंतरच्या घडामोडी” या विषयावर त्यांचे भाषण होणार असून त्यानंतर विचारविनिमयाचा खुला सत्र होणार आहे.
हा कार्यक्रम रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, परवाना भवन, किंग्सवे हॉस्पिटलच्या मागे, कस्तूरचंद पार्क जवळ, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम फुले आंबेडकर इंटेलेक्च्युअल फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.