अवकाळी पाऊस : गोंदिया जिल्ह्यात धान पिकांचे अभूतपूर्व नुकसान
गोंदिया जिल्ह्यात दिनांक २६ ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान आलेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. ऐन कापणीच्या हंगामात आलेल्या या संकटाने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. शेतात कापून ठेवलेले धान पाण्यात बुडाले, तर उभे पीक पूर्णपणे नष्ट झाले. अनेक ठिकाणी धानाला कोंब फुटण्यास सुरुवात झाल्याने धान पिकांचे नुकसान इतके प्रचंड आहे की, बळीराजा अक्षरशः…

