पळसगाव-राका येथे 55.50 लाख रुपये खर्चाच्या आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

पळसगाव/राका (ता. अर्जुनी मोरगाव) येथे 55.50 लाख रुपये खर्चून नव्याने उभारल्या जाणाऱ्या आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच जल्लोषात पार पडले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी, पंचायत समितीचे सभापती चेतनजी वडगाये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पं. स. सदस्य सपनाताई नाईक, सरपंच भारती लोथे, उपसरपंच शोभा येरपुडे, सदस्य कुवर मेश्राम, सुभाष कापगते, सविता मलेवार, अर्विंद सलामे, कुंदा सावरकर, पूजा कापगते यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे अशोकजी कापगते, खेमराजजी भेंडारकर, माजी सभापती गिरधारी हत्तीमारे, डॉ. अविनाश दोनोडे, CHO खेडकर, लक्षिकांत धानगाये, राजेश नंदागवळी, विवेक भेंडारकर, आत्माराम कापगते, तिलाराम कापगते, ललित डोंगरवार, रूपराम बावनकुडे, ग्रामसेविका शहारे ताई, तसेच मुकेश कापगते, हितेश डोंगरे, राजकुमार उंदीरवाडे यांचाही सहभाग होता.
या उपकेंद्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण आरोग्य सेवेत ही एक महत्वाची भर पडणार आहे आणि लोकांच्या आरोग्यसुरक्षेसाठी हा एक ठोस पाऊल ठरणार आहे.