पंढरपूर वारीसाठी नवेगाव वरून आळंदीच्या दिशेने भक्तिमय प्रस्थान!

wartaa.in
Share on

नवेगाव येथून आळंदीच्या दिशेने पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांनी भक्तिभावाने प्रस्थान केले. गोमाता पूजन व विठ्ठल पूजनाने या पवित्र वारीची सुरुवात झाली. भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर व वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान किशोर भाऊ तरोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मंगल सोहळा पार पडला.

वारीच्या या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. यामध्ये केवळरामजी पुस्तोडे, गंगाधर परशुरामकर (सरपंच), होमराज पुस्तोडे (उपसभापती, पंचायत समिती अर्जुनी मोर), नीलकंठ बोरकर (उपसरपंच), चुनीलाल येरणे, सामाजिक कार्यकर्ते प्रेमजी अग्रवाल, निलेश मुनीश्वर, हेमराज फुंडे, किशोर येरणे, विवेक भेंडारकर, भावी खासदार कोकणा, यादराव पाटील, रवीजी मेश्राम, उद्योगपती नितीन पुगलिया व रामदास बोरकर यांचा समावेश होता.

या वारीतून सामाजिक ऐक्य, भक्ती आणि परंपरेचे दर्शन घडले. संपूर्ण परिसरात हरिनामाच्या गजराने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *