Samsung Bootloader Unlock बंद: Galaxy वापरकर्त्यांसाठी धक्का की सुरक्षा?
Samsung ने आपल्या One UI 8 अपडेटसह एक मोठा आणि अप्रत्यक्ष बदल केला आहे — सगळ्या Galaxy युजर्ससाठी Bootloader Unlocking बंद केलं आहे. हे पॉलिसी आधी फक्त US मॉडेल्सपुरती मर्यादीत होती, पण आता ती ग्लोबली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे Android च्या मॉडिंग कम्युनिटीला मोठा झटका बसला आहे.
Bootloader Unlock म्हणजे काय? हे एक अशा फिचर आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवर Root Access मिळवण्यास, Custom ROMs इन्स्टॉल करण्यास आणि सिस्टीम स्तरावर नियंत्रण ठेवण्यात मदत करते. पण One UI 8 मध्ये OEM Unlock Toggle Developer Options मध्येच दिसेनासा झाला आहे. आणि याचे कारण Samsung ने आपल्या Bootloader मध्ये “androidboot.other.locked=1” असा कोड ऍड केलाय, ज्यामुळे ही सेटिंग पूर्णपणे गायब होते.
हे बदल Google Pixel सारख्या डिव्हाइसेसपेक्षा Samsung फोन्सना योग्यरित्या लॉक करून टाकतात. आधी Samsung ची पॉलिसी इतर चायनीज कंपन्यांपेक्षा मोकळी होती, पण आता त्याने Xiaomi सारख्या कंपन्यांच्या मागे वाटचाल केली आहे. ही सुरक्षा उपाय योजना असूनही बर्याच power users आणि developers साठी ही मोठी मर्यादा आहे.
या बदलामुळे Rooting, Magisk Modules, Custom Kernels आणि prolong software updates सारख्या गोष्टींना रामराम ठोकावा लागनार आहे. विशेषतः ज्यांना त्यांच्या Android डिव्हाइसचे पूर्ण स्वातंत्र्य हवे असते, त्यांच्यासाठी ही खूप निराशाजनक बाब आहे.
Samsung च्या या निर्णयामागील कारण म्हणजे त्यांच्या फोन्सना आता 7 वर्षांच्या Guaranteed Updates ची सुविधा देणं. कंपनीने असा विश्वास दर्शवला आहे की, वापरकर्त्यांना third-party ROMs ची गरज भासणार नाही. पण customization आणि control ची गरज असलेले तंत्रज्ञ, power users आणि hobbyists साठी हा अनेक स्वप्नांचा अंत ठरू शकतो.
हे बदल खास करून नवीन Galaxy Z Fold 7, Z Flip 7 आणि आगामी Galaxy S25 सीरिजमध्ये अनुभवायला मिळतात. आधीच bootloader unlock केलेले काही डिव्हाइसेस देखील One UI 8 वर अपडेट केल्यानंतर पुन्हा लॉक झाले आहेत!
कदाचित हे निर्णय सुरक्षा आणि stability चा विचार करून घेतले असतील, पण त्यामुळे Android च्या “ओपननेस” आणि “मॉडिंग संस्कृती” ला जबरदस्त धक्का बसतो आहे.
जर तुम्ही Bootloader Unlock करायचा विचार करत असाल, आणि One UI 7 वर असाल, तर लवकर निर्णय घ्या कारण एकदा One UI 8 वर अपडेट झाल्यावर हे शक्य होणार नाही.
Samsung चा हा निर्णय Android सिस्टीमच्या ‘उघड’ (open) संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो तर दुसरीकडे वापरकर्त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देतेय. पण ही बदलांची लाट नेमकी ग्राहकांच्या बाजूने आहे, की त्यांच्या हातातून स्वातंत्र्य हरवून घेणारी — याचे उत्तर वेळच देईल.

