सय्यारा चित्रपटामुळे प्रेक्षक ढसाढसा रडले

wartaa.in
Share on


2025 मधील सर्वात चर्चेत असलेला आणि भावनिकदृष्ट्या लोकांना हादरवणारा चित्रपट म्हणजे सय्यारा. Generation Z साठी या सिनेमाने केवळ एंटरटेन्मेंटचा अनुभव दिला नाही, तर त्यांच्या आयुष्यातील खऱ्या हृदयवेदनेला देखील स्पर्श केला. अनेक प्रेक्षक चित्रपट पाहताना रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि हे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

मात्र या व्हिडीओजविषयी एक चर्चा जोर धरते आहे – की हे रडतानाचे व्हिडीओज खरे आहेत का? की हे यशराज फिल्म्सच्या ‘साइलेंट मार्केटिंग’ तंत्राचा एक भाग आहेत?

सय्यारा चित्रपटाचा प्रभाव इतका खोल आहे का?

अनेक मानसशास्त्रज्ञांनी यावर भाष्य करत सांगितले की, हे व्हिडीओज खरे असण्याची दाट शक्यता आहे. सय्यारा ही एक सॉन्ग रायटर लव्ह स्टोरी असून ती इतकी भावनिक आहे की, प्रेक्षक तिथे एका कनेक्शनमध्ये गुंततात. स्क्रीनवरील पात्रांशी एक इमोशनल बॉन्ड तयार होतो, ज्यामुळे त्या कथेला प्रेक्षक स्वतःचं समजून घेतात आणि तेच भावनात्मक रडण्यामागचं कारण ठरतं.

व्हिडीओ व्हायरल झाले, पण ते खरे की प्लॅन्टेड?

सोशल मीडियावर जे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत त्यावरून अनेकांनी असेही म्हटले की, हे ‘प्लॅन्टेड’ म्हणजे मुद्दाम तयार केलेले व्हिडीओ असू शकतात. काही जणांचे म्हणणे आहे की, हे सगळं एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग आहे. कारण सय्यारा सिनेमाने पहिल्याच दिवशी 21.5 कोटींची कमाई केली, आणि पहिल्या आठवड्यात 100 कोटींहून अधिक कलेक्शन पार केलं.

साइलेंट मार्केटिंगची अजून एक यशस्वी उदाहरण

पूर्वी आशिकी 2 चित्रपटासाठीही हीच टेक्निक वापरण्यात आली होती. हिरो-हिरोइन कोण आहेत हे गुप्त ठेवून गाणी आणि पोस्टर्स रिलीज करण्यात आले. सय्यारा मध्ये देखील आहान पांडे आणि अनीत पद्दा यांचा चेहरा सुरुवातीला उघड करण्यात आला नव्हता. त्यामुळे प्रेक्षकांनी स्वतः पात्रांच्या कथेत गुंतले, आणि तिथेच स्ट्रॉंग इमोशनल अटॅचमेंट तयार झाला.

मीम्स आणि ट्रोल्सचा उद्रेक

सय्यारा चित्रपटामुळे निर्माण झालेल्या भावनिक लाटेमुळे ट्रोलर्स देखील शांत बसले नाहीत. रडणाऱ्या लोकांचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि त्यावर अनेक मीम्स तयार झाले. पण हे ट्रोल्स हे केवळ चित्रपटाच्या प्रभावावर आधारित असल्याचे समजायला हवे.

थोडक्यात…

सय्यारा हा चित्रपट केवळ एक सिनेमॅटिक अनुभव नाही, तर ही एक भावनिक यात्रा आहे. जिथे Generation Z स्वतःला त्या कथेच्या पात्रांमध्ये शोधत आहेत. रडणं हे त्यांचं खोटं नाही, ते त्यांच्या आतल्या जखमा उघडून टाकणारं आहे. हे खरंच आहे की सिनेमा कधी कधी तुमच्या मनाच्या खोल कोपऱ्याला स्पर्श करून जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *