पहिली घंटा… पहिलं पाऊल…!

डव्वा (ता. सडक अर्जुनी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या शाळा प्रवेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांचे औपचारिक आणि उत्साही स्वागत करण्यात आले.
पहिल्यांदाच शाळेत पाऊल टाकणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. आमदारांच्या हस्ते साहित्य वाटप झाल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्ग विशेष आनंदित झाले.
या वेळी आमदारांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मेहनत, शिस्त आणि चिकाटी या गुणांवर भर देत त्यांनी शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली उलगडली. शिक्षकांशी संवाद साधताना शाळेतील अडचणी, आवश्यक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी सल्लामसलत करण्यात आली.
या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले, गटशिक्षणाधिकारी एल. चव्हाण, सरपंच योगेश्वरी चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.