शाळांचा वेळ बदलला

गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये २३ जून २०२५ पासून प्रवेशोत्सव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २३ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी शाळांमधील प्रधानाध्यापक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीमुळे शाळांचा वेळ बदलण्यात आला असून, त्या दिवशी सकाळी ७ ते ११.४५ या वेळेतच शाळा भरविण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांनी २० जून रोजी आदेश जारी केला आहे. शाळांनी प्रवेशोत्सवाची तयारी नियोजनबद्ध आणि प्रभावी रित्या करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शाळांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचे योग्य डॉक्युमेंटेशन करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.