शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुढाकार

भंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा भंडारा शाखेच्या वतीने समाजसुधारक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला समितीचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. युवराज खोब्रागडे, जिल्हा प्रधान सचिव चंद्रशेखर भिवगडे, जिल्हा वैज्ञानिक जाणीवा कार्यवाह अचल दामले, तसेच कविता लोणारे, रुपाली लोणारे, बाळकृष्ण गायधने आणि मयुर गायधने आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजात विवेक, समता आणि शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सामाजिक जबाबदारीचे भान जपत ही जयंती साजरी केली.