समाजभूषण श्रीपतजी बांते यांचे दुःखद निधन — बावणे कुणबी समाजाच्या वाटचालीतील अढळ स्थान हरपले

भंडारा :
बावणे कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष, संस्थापक, समाजभूषण मा. श्री श्रीपतजी बांते यांचे आज (25 जून 2025) पहाटे 1 वाजता रुखमिणीनगर, खात रोड, भंडारा येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
श्रीपतजी बांते हे केवळ एक नेतृत्वकर्ता नव्हते, तर उत्कृष्ट क्रीडापटू, कुशल संघटक, प्रेरणादायी शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणूनही त्यांची ख्याती होती. बावणे कुणबी समाजाची स्थापना करून त्यांनी समाजातील एकात्मता आणि प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतले.
त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. आज दिनांक 25 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार असून, वैनगंगा घाट, भंडारा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.