आय लव्ह पाकिस्तान
वॉशिंग्टनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘आय लव्ह पाकिस्तान’ असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प म्हणाले, “मी युद्ध थांबवलं… मला पाकिस्तानवर प्रेम आहे.” या वक्तव्यानंतर भारतातील अनेक राजकीय आणि सामाजिक वर्तुळांत चर्चेला उधाण आलं.
पाकिस्तानचे सध्याचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी भेटीपूर्वी ट्रम्प यांनी हे विधान केलं. त्यांनी मुनीर यांचं विशेष कौतुक करताना सांगितलं की, “मुनीर यांनी युद्ध टाळण्यात मोठी भूमिका बजावली.”
ट्रम्प यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा अमेरिकेचा झुकाव कोणत्या दिशेने आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

