आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्राचे लोकार्पण

wartaa.in
Share on

तुमसर, (गोंदिया) — आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र, तुमसर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारतीचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले. १ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चातून उभारलेली ही इमारत स्थानिकांसाठी आरोग्यसेवेचा नवा टप्पा ठरणार आहे.

या नव्या इमारतीमुळे तुमसरसह परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक आणि आधुनिक प्राथमिक आरोग्यसेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार असून, स्थानिक आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, सभापती डॉ. लक्ष्मण भगत, गोरेगाव पंचायत समिती सभापती सौ. चित्रलेखा चौधरी, उपसभापती श्री. रामेश्वर महारवाडे, माजी सभापती मनोज बोपचे आदी मान्यवर उपस्थित होते.

सरपंच सौ. योगिता देशमुख, तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस श्री. सुरेंद्र रहांगडाले, तसेच आरोग्य अधिकारी, समाजसेवक, ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर, पोलीस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागात हायटेक सुविधा मिळणार असून, उपचारासाठी मोठ्या शहराकडे जाण्याची गरज भासणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *