वन महोत्सव : एक पेड़ माँ के नाम 2.0
गुढरी येथे २० हेक्टरवर २२ हजार वृक्षांची यशस्वी लागवड!

wartaa.in
Share on

वनपरिक्षेत्र नवेगावबांध, सहवनक्षेत्र बाराभाटी व नियतक्षेत्र चान्ना बाक्टी यांच्या संयुक्त विद्यमाने “वन महोत्सव : एक पेड़ माँ के नाम 2.0” उपक्रमांतर्गत गुढरी (ता. अर्जुनी मोर) येथे २० हेक्टर क्षेत्रावर तब्बल २२,००० वृक्षांची यशस्वीपणे लागवड पार पडली.
पिंपळ, वड, आंबा, साग, जांभूळ, चिंच यासह विविध देशी व विदेशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जोमाने सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन व वृक्षसंवर्धनाच्या गरजेवर भर दिला.
“हे अभियान केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित नाही, तर निसर्ग व मातृत्व यांच्यातील नात्याचे प्रतीक आहे,” असेही मत व्यक्त झाले.
“प्रत्येक झाड आई आणि धरती मातेच्या सन्मानाचे प्रतिक आहे. त्यामुळे लागवडीनंतर देखील त्यांचे संगोपन हेच खरे जबाबदारीचे काम आहे.”

या अभियानात लायकरामजी भेंडारकर (जिल्हा परिषद अध्यक्ष), सौ. रचनाताई गहाने, सौ. पुष्पलताताई दृगकर, श्री. लोकपाल गहाने, श्री. पवनकुमार जॉग (उपवनसंरक्षक, गोंदिया), श्री. अविनाश मेश्राम, सौ. पल्लवी वाडेकर, श्री. कमलेश सोनटक्के, श्री. सदाशिव अवगाण, विवेक डोंगरे, श्री. लिलेश्वर खुणे, दादाजी संग्रामे, व्यंकट खोब्रागडे, योगेश नाकाडे, सुरेंद्र ठवरे, भागवत लंजे, देवेंद्र दृगकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *